जालना जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या सततधार पावसामुळे बाधित झालेल्या शहरातील कुटुंबांना सेंटर फॉर एग्रीकल्चर अँड डेव्हलपमेंट अर्थात कार्ड संस्थेच्या माध्यमातून शेल्टर कम हायजीन किट्सचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जालना येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सभागृहात दि.25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता संच वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राजू एडके, स्नेहल मोदाळे उपस्थित होते.