पवनी - भंडारा राज्यमार्गावर कोंढा येथे डॉ. अरुण मोटघरे कॉलेजजवळ बुधवारी (दि. २४) ८ ते ८:३० वाजेदरम्यान बंद असलेल्या उभ्या ट्रकला मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. मृताचे नाव देवीदास शिवराम उपरीकर (५०, वाकेश्वर) असे आहे. देवीदास उपरिकर हे सेंद्री (खुर्द) येथे नातेवाइकाकडे अंत्यविधीसाठी गेले होता.