छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात गुन्ह्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रमुख उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला मराठा आंदोलन उत्कृष्टपणे हाताळल्याबद्दल पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड यांचा गौरव केला.