वानवडी पोलिसांनी घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस चोरून तो रिकाम्या टाकीत भरून काळ्या बाजारात जास्त दराने विकणाऱ्या टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रिकाम्या टाक्या, टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.