गौरी गणपती विसर्जनानंतर आता कोकणातील गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अनंत चतुर्थी जवळ आल्यामुळे कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या आज पासून हाउसफुल झाले आहेत. मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये परतणाऱ्या चाकरमान्यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली आहे.