विना परवानगी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणाहून बेकायदेशीरित्या विक्री होणाऱ्या मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १२ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता शिरसोली रस्त्यावरील हॉटेल सरोवर येथे केली. याप्रकरणी हॉटेल मालकासह मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.