सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय निवासी शाळांमधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकांना सन २०२२-२३ पासून ‘प्राविण्य पुरस्कार’ दिला जातो. शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये अमरावती (समाजकल्याण) विभागातून वाशिम जिल्ह्यातुन मुख्याध्यापक लक्ष्मण सुरजूसे यांची तर गृहपाल म्हणून शेषराव इंगोले गुणवंत मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह वाशिम यांची उत्कृष्ट तसेच प्राविण्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.