महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे यासाठी नागपूर ते चैत्यभमी पर्यंत भंते विनायचार्य यांची पंचशील धम्म ध्वज यात्रा ही दि. 16 ऑगस्ट 2025 पासून सुरु झाली असून ती शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात दाखल होणार आहे. नागपूर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी मुंबई अशी ही यात्रा आहे. अशी माहिती हरिष रत्नपारखे यांनी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता दिली. बिहार मधील महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद पंचशिल धम्म ध्वज यात्रा सुरु करण्यात आली आहे.