केंद्र सरकार पुरस्कृत जल जीवन मिशन अंतर्गत आणि शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हा पाणी व स्वच्छता समितीची आढावा बैठक आज शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास अध्यक्ष, जिल्हा पाणी व स्वच्छता समिती तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.