तालुक्यातील अकोली वाडगाव येथे बुधवारी (दि.१०) सायंकाळी सात वाजता अवैधरीत्या सुरू असलेल्या देशी दारूच्या अड्ड्यावर शिल्लेगाव पोलिसांनी छापा टाकला. यात भगवान भागचंद आल्हाट (वय ३७) या आरोपीस अटक करून त्याच्या ताब्यातून १ हजार ७०० रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल सचिन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.