रस्त्यावर कुत्रा अंगावर आल्यामुळे दुचाकी रस्त्यात थांबवणाऱ्या एका दुचाकीस्वाराशी तिघांनी वाद घातला. दुचाकीस्वाराला धमकावून त्यांच्याकडील फोनमधून जबरदस्तीने पैसे ट्रान्स्फर करून घेतले. ही घटना पिंपरी येथे घडली. याप्रकरणी प्रणय कुमार स्वाईन (रा. सप्तशृंगी कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आलय.