माननीय न्यायालयात सासू वर विनयभंग आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दाखल केसचा राग मनात ठेवत नंदुरबार शहरातील कामनाथ नगर भागात जावयाने पुन्हा सासु वर जीवघेणा हल्ला केला आहे. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पत्नीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पती दीपक पुंडलिक पाटील रा. चोपडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.