निलंगा येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रास्ता रोको आंदोलन जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी राजा उद्ध्वस्त झाला असून या शेतकऱ्याला सरकारने तातडीची एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निलंगा कासारसिरसी मार्गावरील दादगी मोड येथे केलेल्या भव्य रास्तारोको आंदोलनादरम्यान मनसे कडून जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने यांनी केल