नासर्डी पुलाचा कठडा कोसळला : प्रशासनाचे डोळेझाक.. नाशिक ,नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाचा कठडा कोसळून अनेक दिवस उलटून गेले असून, त्या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे, अशी तीव्र नाराजी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाचा तोल सुटल्याने त्याचे रिक्षा सरळ नदीत कोसळले होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र भविष्यात जीवितहानी होण्याची शक्