पालघर तालुक्यातील उमरवाडी सरपाडा परिसरात अंकित राम हा साडेपाच वर्षाचा मुलगा त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. दुपारी तो खेळण्यासाठी गेला असता घरी परतला नाही त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. पालघर पोलीस ठाण्यात अंकित हरवल्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत सोसायटी परिसराची पाहणी केली असता अंकितचा मृतदेह एका उघड्या पाण्याच्या टाकीत आढळला. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.