नगर-मनमाड महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून,आज पुन्हा एका तरुणाचा रस्ता अपघात दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वांबोरी फाटा परिसरात आज बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात सागर साहेबराव रणदिवे (रा.अगस्थान, ता. पाथर्डी,) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.