डि-मार्टजवळील सर्व्हिस रस्त्यावर रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दीपक साहू (वय 28, रा.निर्वाणा सोसायटी) असे मृत तरुणाचे नाव आहे. संबंधित डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.