जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे तरुण सुलेमान पठाण यांच्या निर्घृण हत्येच्या विरोधात मायनॉरिटी राईट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने झाली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून सर्व आरोपींना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबाला नोकरी व आर्थिक मदत द्यावी, तसेच अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करावेत, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.