स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर निर्मितीसाठी अमरावती महानगरपालिकेने गाडगे नगर येथील जीवीपी पॉईंटचे सौंदर्यीकरण ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या संकल्पनेवर आधारित करत एक अभिनव उपक्रम राबविला आहे. या उपक्रमात जुन्या टाकाऊ टायरला रंगवून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले असून, वापरलेल्या प्लास्टिक बाटल्यांना आकर्षक रंग देऊन परिसराची सजावट करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसर अधिक देखणा, पर्यावरणपूरक आणि लोकांचे लक्ष वेधून घेणारा बनला आहे.