मुंब्रा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ईद-ए-मिलाद निमित्त जुलूसचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र जुलूसमुळे मोठ्या प्रमाणात मित्तल रोडवर वाहतूक कोंडी झाल्याचं आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 9च्या सुमारास दिसून आलं आहे. मिळेल तसा रस्त्याने अनेक दुचाकीस्वार आपली गाडी चालवत असल्याचा समोर आला असून या ठिकाणी वाहतुकीची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच वाहतूक विभागाचे कोणतेही कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नसल्याने ही वाहतूक कोंडी वाढत चालली आहे.