मोहोळ रेल्वे स्टेशन येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे सिद्धेश्वर एक्सप्रेस ला थांबा मिळाला आहे. त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सीमा पाटील यांनी केले आहे. आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजता मोहोळ येथे पत्रकार परिषद घेत सीमा पाटील यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, सुरुवातीला त्यांनी सिद्धेश्वर एक्सप्रेसला मोहोळ येथे थांबा मिळावा, अशी मागणी केली होती, असे सांगितले.