नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी 21 ऑगस्टला रात्री 8 वाजता दिलेल्या माहितीनुसार कुंभार टोळी येथे फक्त तीनशे रुपये साठी खून केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवाविच्छेदनासाठी पाठविला आणि या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी दिली आहे.