मॅक्स हॉस्पिटल समोरील उडान पुलावर स्कूलबस व स्कूल व्हॅनची अमोरासमोर धडक झाली. यामध्ये व्हॅन चालक गंभीर जखमी झाला असून व्हॅन मध्ये असलेले विद्यार्थी देखील जखमी झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात जखमी विद्यार्थ्यांपैकी एक जनाची प्रकृती गंभीर असल्याची सांगण्यात येत आहे.