हिरापूर गावातील जुन्या विहिरीत घडलेल्या अनोख्या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये चर्चेची लाट उसळली आहे.विहिरीत पाणी जणू उकळत असल्याप्रमाणे सतत खळखळाट सुरू आहे, बुळबुळे वर येत आहेत आणि पाणी हलत आहे.हा प्रकार पाहून ग्रामस्थ अचंबित झाले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,सहा महिन्यांपूर्वी याच विहिरीत असाच प्रकार घडला होता. एवढेच नाही तर दुसऱ्या वेळी तर विहिरीत स्फोटसुद्धा झाल्याचे दिसुन आले. आता पुन्हा तिसऱ्यांदा पाणी उकडल्यासारखे दिसत असल्याने शंका अधिक गडद झाली आहे.