माझी लाडकी बहिण योजनेची सदस्य नोंदणी सुरू केल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी १७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता दिली. पश्चिम विधान सभेतील बालाजीनगर, जवाहर कॉलनी येथे माझी लाडकी बहिण योजनेचे नोंदणी केंद्राचे उद्घाटन केले असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली. जवळ पास 700 भगिनींनी नोंदणी केली. भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले शहरातील हे आठवे केंद्र आहे. असेच केंद्र पूर्व विधान सभा, मध्य विधान सभा येथे पण सुरू केले आहेत, तर अजून 15 केंद्र सुरू होणार आहेत.