तालुक्यातील सिंदी (रेल्वे) येथे सिंदी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना मोठी कारवाई केली. मात्र, या दरम्यान आरोपींनी पोलिसांवर हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रकार घडला. ही कारवाई ता. २ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजताचे सुमारास घडली असून ता. ३ सप्टेंबरला मध्यरात्री ३.४५ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोघे फरार झाले आहेत. अशी माहिती ता. ४ ला सिंदी पोलिसांकडून प्राप्त झाली.