आज दिनांक एक आक्टोंबर 2025 वार बुधवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरामध्ये सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा तसेच धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाची सरकारने दखल घ्यावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या दरम्यान पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरोशे व प्रभारी तहसीलदार तायडे तसेच धनगर आंदोलन यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे.