अतिवृष्टीचा फटका – कैलास पाटील यांची पाहणी धाराशिव तालुक्यातील अंबेजवळगा येथे आमदार कैलास पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी केली. पाण्यामुळे सोयाबीन, उडीद, मुग, तुर पिकांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून रोगराईही पसरली आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशा सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.