नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयास महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अचानक भेट दिली असता कार्यालयातील भोंगळ कारभार स्पष्टपणे उघड झाला. या भेटीदरम्यान दुय्यम निबंधक अधिकारी गैरहजर आढळले. कार्यालयातील हजेरी पुस्तिकेत कर्मचाऱ्यांची नावे आणि स्वाक्षऱ्या नव्हत्या, तसेच कर्मचाऱ्यांना ओळखपत्रही प्रदान करण्यात आलेले नव्हते. विशेष म्हणजे, कार्यालयाशी कोणताही अधिकृत संबंध नसलेल्या अनधिकृत व्यक्ती मुक्तपणे वावरताना आढळल्या.