कोंडाळा झामरे येथे झालेल्या जिल्हा,स्तरीय विज्ञान शिक्षक कार्यशाळेत वाशीम जिल्ह्यातील तंत्रस्नेही विज्ञान शिक्षक विजय देविदास भड लिखित ‘ओळख भारतीय शास्त्रज्ञांची’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार किरण सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी केले. अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे होते. प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान भारतीचे नरेश चाफेकर, गिरीश जोशी, रोहन गणोरकर, प्राचार्य सुनील भोईर, प्रभारी विज्ञान पर्यवेक्षक ललित भुरे, होते.