दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथील गोरनाळे वस्ती व वांगी या मार्गावरील वोड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. सोमवारी सकाळपासून झालेल्या पावसामुळे वोड्यात तब्बल ७ ते ८ फूट पाणी साचले असून रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे गोरनाळे वस्तीचा वांगीसह परिसरातील गावांशी संपर्क तुटला आहे. स्थानिक प्रशासनाने समस्त नागरिकांना विनंती केली आहे की, पाणी ओसरेपर्यंत कोणीही या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.