धुळ्यातील मुसळधार पावसाने प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. रेड अलर्ट असूनही जिल्हा रुग्णालय परिसर जलमय झाला असून रुग्ण व नातेवाईकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. लाखो खर्चून उभारलेली नवी इमारत असूनही पाण्याचा निचरा नसल्याने ही वेळ आली. महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी टाळत असताना, रुग्णांचे हाल थांबणार कधी हा प्रश्न आहे.