यवतमाळ शहरातील वाधवानी कॉलेजवळ धामणगाव रोड येथे 5 ऑगस्ट रोजी प्रमोद तांदूळकर हे कामावरून घराकडे परत येत असताना दुचाकी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवीत असताना दुचाकी स्लिप होऊन गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.