महाराष्ट्र शासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते लोकलेखा समीतीचे अध्यक्ष विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या आईचे अलीकडेच दुःखद निधन झाले.दि.29 ऑगस्टला तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी नागपुर येथे सांत्वना भेट दिली. व श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती पी.जी.कटरे, खासदार श्याम बर्वे, गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष डेमेद्र रंहागडाले, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष झामसिंगभाऊ बघेले आदी उपस्थित होते.