सांगोला तालुक्यातील तळेवाडी येथे मासे पकडण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले. याप्रकरणी तिघांविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, सचिन गणपत खांडेकर यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी रावसाहेब कृष्णा पवार, अजित रावसाहेब पवार व बापू रमेश कोमटे, सर्व जण रा. चिकमहूद (तळेवाडी), ता. सांगोला यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.