सातारा नगरपालिकेत प्रातांधिकाऱ्यांनी १२ हकरतदारांचे म्हणणे ऐकून घेतले सातारा पालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात सातारचे प्रांताधिकारी अभिजित बारकुल यांच्यासमोर सकाळी ११.३० ते १२.३० वाजण्याच्या सुमारास निवडणूकीच्या प्रभाग रचनेवरील १२ हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया पार पडली. त्यात हरकतदारांनी कॉलनीतील काही घरे एका प्रभागात तर काही घरे दुसऱ्या प - भागात आहेत. एका कॉलनीतली काही घरे दुसऱ्या प्रभागात, एक अपार्टमेंट तीन प्रभागात अशा काहीशा तक्रारी होत्या. सर्व हरकती इन कॅमेऱ्यात झाल्या.