कर्नाटकचे विद्यमान सभागृह नेते तसेच लघु सिंचन,विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आमदार एम. एस. बोसे राजू यांच्या नेतृत्वाखाली शासकीय पथकाने 23 सप्टेंबर रोजी शिरपूर तालुक्यातील प्रसिद्ध शिरपूर पॅटर्न अंतर्गत झालेल्या जलसंधारण कामांचा प्रत्यक्ष दौरा करून पाहणी करून खूपच समाधान व्यक्त केले.यावेळी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.