घाटंजी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी,मजूर,व्यापारी व सर्वसामान्य जनता संकटांमध्ये सापडली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेली असून शेतजमिनीवर पाणी साचल्यामुळे पिकाची नासधूस झाली आहे...