गुरुदत्त मशनरी दुकानात चोरी; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण अंबड (जालना): अंबड–जालना–बीड रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कॉलेज रोड येथे असलेल्या गुरुदत्त मशनरी या दुकानात चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे. गुरुदत्त मशनरीचे संचालक गोविंद सर्जेराव भोरे (रा. बोरी, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, कॉलेज रोड) यांच्या दुकानात सोमवारी पहाटे चोरी झाल्याची माहिती मिळाली. ही घटना सकाळी सहा वाजेच्या सुमारास ओळखीच्या एका व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून गोविंद सर्जेराव भोरे यांना कळवली. त्यांनी तत्काळ