भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गोसेखुर्द येथील जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाली. जलाशयातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी १ सप्टेबर रोजी राञी ८ वाजताच्या सुमारास गोसेखुर्द धरणाचे ९ गेट अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. गोसेखुर्द धरणाचे सध्या ९ दरवाजे उघडण्यात आले असून यामधून १ हजार १८७ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या भंडारा येथील कारधा पातळी २४३.४९ मीटर आहे. ही पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.