शहरातील करवंद नाका परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडी व मारुती स्विफ्टसह दोन दुचाकी लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात 31 ऑगस्ट रोजी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.बुधवारी पहाटे अज्ञात तीन चोरट्यांनी घरात अनधिकृत प्रवेश केला मात्र घरफोडी करूनही त्यांना रिकाम्या हाती पळ काढावा लागल्या घरमालकाची मारुती स्वीप्ट गाडी अंगणातून दगडफेक करीत लंपास केली.तसेच परिसरातील दोन शाईन दुचाकी देखील त्याच कालावधीत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दाखल केली.