नगरधन येथील शेतमजूर संतोष प्रेमलाल लटये वय 32 वर्ष व ज्ञानेश्वरी लटये या पती-पत्नींनी परिश्रम घेऊन शेतात काम करून तसेच धान रोवणीचे काम करून पाई पाई गोळा करून 40 हजार रु. जमा केले. घरी आलमारी नसल्याने ते एका कापडी पिशवीत भरून पिशवी खुंटीला टांगून ठेवली. मात्र सोमवारच्या मध्यरात्री केव्हातरी कुणी अज्ञात चोरट्याने डाव साधला व 40 हजार रु. चोरून नेल्याची घटना सोमवार दि. 01 सप्टेंबरला मध्यरात्री घडली. मंगळवार 2 सप्टेंबरला सकाळी जाग आल्यानंतर ही बाब लक्षात आली.