वाशिम जिल्ह्यात कालपासून गणेश विसर्जन मिरवणूक जोरदार सुरुवात झाली असून पोलीस दलावरील ताण कमी होण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने दिनांक 7 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यास परवानगी दिली होती या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यामध्ये आज दुपारी चार वाजता गणेश विसर्जन मिरवणुका सुरुवात झाली असून यामध्ये इंझोरी सह विविध गावांमध्ये ढोल ताशाच्या गजरात शांततेत गणेश विसर्जन मिरवणूकला सुरुवात झाली असून रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका चालणार आहेत.