जागतिक धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानच्या गैरकारभाराविरोधात अनेक वर्षांपासून वेगवेगळे आरोप आणि आंदोलने झाली. मागील विधानसभा अधिवेशनात शनिशिंगणापूरच्या गैर कारभारा विरोधात आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी थेट विधानसभेत आवाज उठवल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत शनिशिंगणापूरच्या गैरकारभाराची चौकशी सुरु केली होती. याबाबत आज आमदार विठ्ठल लघे यांनी पत्रकारांना माहिती दिली