आज दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 93.49% एवढा झाला असून, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पात 829.545 कुसेक्सने पाणी आवक होत आहे. सध्या 376.454 कुसेक्सचा विसर्ग सुरू असून, त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवना नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात असलेली वाहने, जनावरे व लोकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.