शहापूरच्या शाळेत विद्यार्थिनींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी करून मासिक पाळीची पडताळणी करण्याची घटना ही केवळ निंदनीय नाही, तर मानवी संवेदनशीलतेवरच घाला आहे. आज दिनांक १० जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास आमदार ज्योती गायकवाड यांनी विधानसभेत या घटनेचा तीव्र निषेध करत शासनाकडे ठाम मागणी केली की राज्यातील प्रत्येक शाळेत शौचालयांमध्ये स्वच्छ पाणी, सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल आणि मासिक पाळीसंबंधी मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या जाव्यात अस त्यांनी सांगितलं.