राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान बिबट्याने शेतकऱ्याला दर्शन दिल्याने या परिसरामध्ये शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. उंबरे केंद्र रोडवरील तांबे वस्ती परिसरामध्ये हा बिबट्या अनेक शेतकऱ्यांना दिसला, गेल्या काही दिवसापासून या परिसरात व्यक्तीचा मुक्त संचार असल्याने विठ्ठला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी केली जात आहे.