सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अद्याप MRI मशीनची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांचा मार्ग धरावा लागत असून मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश प्रवक्ता ॲड. योगेश शिदगणे यांनी शनिवारी दुपारी 12 वाजता पत्रकारांशी बोलताना दिला आहे. शिदगणे यांनी सांगितले की, “शासकीय रुग्णालयांमध्ये गरीब व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात.