शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ब्राह्मणी येथील स्मशानभूमीची पाहणी केली. ब्राह्मणी हे गाव कळमेश्वर नगरपालिकेत विलीन झालेले आहे परंतु तरीही नगर परिषदेतर्फे पाहिजे तितके लक्ष ब्रामिया गावाकडे दिले जात नाही. आज शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी स्मशानभूमीची पाहणी केली.