वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले व गहाळ झालेले मोबाईचा शोध घेण्यात आला. असे ४ लाख रुपयांचे २० मोबाईल व १ टॅब शोधून ते मूळ मालकांना परत केले. या मोबाईलचा शोध राज्य व परराज्यातून बाईच्या डीबी पथकाने लावला आहे. ही कारवाई वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो. कॉ. विशाल शिंदे, पो. कॉ. हेमंत शिंदे, पो. कॉ. नितीन कदम, पो. कॉ. श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, पो. कॉ. महेश पवार सायबर यांच्या पथकाने केली